गुन्हे

हृदयद्रावक : एकाच चितेवर दिला ५ मृतदेहांना अग्निडाग, मृतदेह ओळखणे शक्य नसल्याने घेतला निर्णय

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव‎ लाईव्ह न्यूज ।२२ मे २०२२ । महाराष्ट्रातील एका जिल्हात दोन दिवसात एक भयानक अपघात झाला होता. यावेळी चंद्रपूर जिल्ह्यातील जवळील अजयपुर येथे लाकडांनी भरलेला ट्रक व डिझेल टँकर मधे जोरदार धडक होऊन दोन्ही वाहने आगीच्या भक्षस्थानी पडले होते. हा अपघात इतका भिषण होता की 9 लोकांचा जागीच जळून मृत्यू झाला होता. या यावेळी मृत झालेल्या व्यक्तिंची ओळख न पटल्यामुळे त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अधिक माहीती अशी कि, भयानक आगीमुळे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या मृतदेहांची ओळख पटविणे सुद्धा अशक्य होऊन बसले होते. मात्र ह्या 9 मृतकांपैकी प्रशांत नगराळे, साईनाथ कोडापे, मंगेश टिपले, महिपाल मडचापे, संदीप आत्राम, बाळकृष्ण तेलंग हे 6 लोक बल्लारपूर तालुक्यातील दहेली ह्या एकाच गावाचे असल्याचे सांगण्यात आले. यामुळे त्या गावावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.

प्रशासनाने प्रयत्नपूर्वक सर्व मृतदेहांचे शवविच्छेदन करून शव नातेवाईकांना सुपूर्त केले मात्र संदीप आत्राम वगळता प्रशांत नगराळे, साईनाथ कोडापे, मंगेश टिपले, महिपाल मडचापे, बाळकृष्ण तेलंग ह्या पाचही मृतदेहांची ओळख पटविणे अशक्य असल्याने अखेर सर्वांचे मृतदेह गाठोड्यात बांधुन कुटुंबीयांना सुपूर्त करण्यात आले होते. अखेर आज त्या पाचही मृतदेहांचे एकाच चितेवर अंतिम संस्कार करण्यात आले.

Related Articles

Back to top button