⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | आरोग्य | तुम्हालाही मजबूत मसल्स बनवायचेय? मंग रोजच्या आहारात करा या 5 फळांचा समावेश

तुम्हालाही मजबूत मसल्स बनवायचेय? मंग रोजच्या आहारात करा या 5 फळांचा समावेश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२२ । कोणाला मजबूत मसल्स मिळवायचे नाहीत, परंतु प्रत्येकजण ते साध्य करू शकत नाही. जिममध्ये घाम गाळल्याशिवाय हे करणे जवळजवळ अशक्य दिसते. त्याचसोबत बॉडी बिल्डिंगसाठी आपल्याला हेल्दी फूड खाणे देखील गरजेचे असते. आज आपण जाणून घेऊया यासाठी कोणत्या फळांचा समावेश करावा.

सफरचंद
‘रोज एक सफरचंद खाल्लं तर डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही’ असं म्हटलं जातं, हे फळ शरीराच्या सर्वांगीण वाढीसाठी उपयुक्त आहे. जिम ट्रेनर्स व्यायामापूर्वी सफरचंद खाण्याची शिफारस करतात कारण ते मसल्स मजबूत करतात.

टरबूज
उन्हाळ्यात अनेकदा टरबूज खाण्याचा सल्ला दिला जातो कारण त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने ते शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते, परंतु टरबूज खाल्ल्याने शिरा आणि मसल्समध्ये रक्ताभिसरण सुधारते हे फार कमी लोकांना माहिती आहे.वाढ देखील चांगली होते.

एवोकॅडो
एवोकॅडो हे असेच एक फळ आहे जे फायबरचे समृद्ध स्त्रोत मानले जाते, त्याच्या सेवनाने मसल्सचा टोन होतो. एवोकॅडो खाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यातून सॅलड बनवणे.

द्राक्षे
भारतातील लोक द्राक्षे खूप आवडीने खातात. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट शरीरासाठी फायदेशीर असतात आणि स्नायूंच्या विकासातही मदत करतात. त्यामुळे रोजच्या आहारात द्राक्षांचा समावेश करा.

ड्रॅगन फ्रूट
ड्रॅगन फ्रुटमध्ये फिनोलिक अॅसिड, अँटीऑक्सिडंट्स, फ्लेव्होनॉइड्स, अॅस्कॉर्बिक अॅसिड आणि फायबर यांसारखे पोषक घटक आढळतात. भारतात याला ‘कमलम’ असेही म्हणतात. हे फळ महाग असले तरी नियमित खाल्ल्यास स्नायू मजबूत होतात.

येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी, कृपया वैद्यकीय सल्ला घ्या.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.