यावल
जागृती फिरकेचे एमबीबीएस परीक्षेत यश
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२२ । यावल तालुक्यातील न्हावी येथील रहिवासी जागृती धनंजय फिरके हीने एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण केली. तीने डॉ.व्ही.एम.वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर येथून एमबीबीएस पदवी प्राप्त केली.
तिला अंकुर चितोरा, अमोल मोरे, अभिश्री कोल्हे, शबनम भाटी यांच्यासह गुरुजनांचे मार्गदर्शन मिळाले. ती जळगावच्या शकुंतला जे.विद्यालयातील उपशिक्षक धनंजय फिरके व शा.ल.खडके प्राथमिक विद्या मंदिर जळगाव येथील शिक्षिका स्वाती फिरके यांची सुकन्या आहे. जागृतीच्या या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाने तिचे कौतुक केले.