जळगाव शहर
मल्हार हॉबी डुबी डू मंचातर्फे नाव नोंदणी सुरू
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२२ । मल्हार हॉबी डुबी डू मंचातर्फे उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये मुलांना त्यांचे छंद विकसित करता यावे, नवं काही शिकता यावे यासाठी रतनलाल सी बाफना ज्वेलर्सच्या सहकार्याने समर हॉबी फेस्टचे मोफत आयोजन २३ ते २९ मे दरम्यान के ले आहे.
ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग, ओरिगामी आर्ट, बॉलीवूड स्टाइल डान्स, संगीत व सायबर नॉलेज इ. विविध विषयांवर तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहे. हॉबी फेस्टमध्ये नाव नोंदणीसाठी मल्हार हॉबी डुबी डू या फेसबुक ग्रुपवर असलेल्या रजिस्ट्रेशन लिंकवर जाऊन अर्ज भरावा.