⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | जामनेर | जामनेर वनविभागाची कारवाई : लाकडासह ट्रक जप्त

जामनेर वनविभागाची कारवाई : लाकडासह ट्रक जप्त

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२२ ।
जामनेर तालक्यातील गोद्री परिसरात वनविभागाचे वनपाल प्यारेलाल महाजन व कर्मचारी यांनी गस्त घालत असताना एक ट्रक क्रमांक एम एच ०६ (०३६७) गोद्रीकडून जामनेरकडे संशयीतरित्या जाताना आढळून आला. यावेळी वन कर्मचाऱ्यांनी चौकशी केली असता या ट्रकमध्ये वाहतूक करण्यात येत असलेले इमारती लाकूड आढळून आले.

याबाबत ट्रक चालकाला परवाना विचारणा केली असता सदर इमारती लाकूड हा विना परवाना होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर लाकडासह ट्रक वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतला येथील गोद्री परिसरात अवैधरित्या लाकूड भरून नेणाऱ्या ट्रकवर वन विभागाने कारवाई केली असून लाकडासह ट्रक जप्त करण्यात आला असून या ट्रॅकवर गुन्हा दाखल केला आहे.

विना परवाना लाकूड
वाहतूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर वचक बसणार आहे. सदर कारवाई केल्यामुळे वृक्षप्रेमींनी वन विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे व अश्या प्रकारची कार्यवाही नेहमीच करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे

author avatar
टीम जळगाव लाईव्ह