जळगाव शहर
चला उष्णता कमी करूया, आजूबाजूला झाडं लावुया..
जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२२ । पर्वती घनश्याम नगोरी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण करून आजूबाजूची उष्णता कमी करण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला होता.
श्री पालन करता संस्था यांच्यातर्फे हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी अध्यक्ष गोविंदा नगोरी, गौरव लव्हांगले, कौस्तुभ बागुल, प्रवीण कुलकर्णी व जावेद पिंजारी आदी उपस्थित होते. जळगाव शहरातील व जिल्ह्यातील नागरिकांना वृक्षरोपण करायचे असेल आणि वृक्षांची गरज असेल तर ही संस्था सर्वांना वृक्ष उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी 7276877427 या दूरध्वनी क्रमांकावर फोन लावावा असे सांगण्यात आले आहे.