तांबापुरा दंगल : दहा दंगलखोरांना केली अटक
जळगाव लाईव्ह न्यूज । तांबापुरा दंगल । किरकोळ कारणावरून १७ मे रोजी रात्री तांबापुरात झालेल्या दंगलीत एका सराईत गुन्हेगाराने पोलिस कर्मचाऱ्याच्या अंगावर तीक्ष्ण फरशी मारली. यात पोलिसाच्या हाताला दुखापत झाली. तर एकाने महिलेच्या नाकावर दगड मारला. महिलादेखील जखमी झाली. याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच पाेलिसांनी दहा दंगलखाेरांना अटक केली आहे.
तांबापुरातील गवळीवाडा येथील बिस्मिल्ला चौकात मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दोन जणांमध्ये किरकोळ वाद झाला. या वादातून दोघांनी जमाव बोलावून घेतले. दोन्ही गट समोरासमोर आल्याने हाणामारी होऊन तुफान दगडफेक केली. यामध्ये स्थानिक रहिवाशांच्या घराचे नुकसान झाले आहे.
गाेविंदा अशाेक गायकवाड (वय १८), अजय संजय ठाकरे (वय २३), राहूल गणेश महाजन (वय १९), लखन दिवान गुमाने (कंजर, वय ३२), प्रवीण विश्वनाथ गायकवाड (वय २३), अजय गुनाजी मोरे (वय २२), मयुर देविदास बागडे (वय २३), अजय बिरजु गारुंगे (वय ३०), रितेश उर्फ चिच्या कृष्णा शिंदे (वय २१) व शेख साहिल शेख मुसा (वय २२). जमाव बोलावून घेतले. दोन्ही गट समोरासमोर आल्याने हाणामारी होऊन तुफान दगडफेक केली. यामध्ये स्थानिक रहिवाशांच्या घराचे नुकसान झाले आहे
तर या दगडफेकीत शिरीनबी शेख युनूस (वय २२) यांच्या नाकावर दगड लागल्याने त्या जखमी झाल्या. तसेच त्यांच्या घरातील साहित्याची तोडफोड जमावाने केली आहे. शिरीनबी यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर या दंगलीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आलेले एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कर्मचारी जमीर मुश्ताक शेख यांच्या अंगावरही जमाव धावून आला हाेता. सराईत गुन्हेगार समीर काकर याने शेख यांच्या कपाळाच्या दिशेने फरशी भिरकावली. सुदैवाने त्यांनी हाताने फरशी अडवली. यात त्यांचा हात कापला गेला. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी शिरीनबी व जमीर शेख या दोघांनी स्वतंत्र फिर्याद दिली. त्यानुसार समीर काकर, सय्यद सलमान, कल्पेश सोनार, दीपक, अजय, राहुल, गुलाब, वास्तव, सोमा, नितीन, लखन, गोविंदा गायकवाड, भिला हटकर, विठ्ठल हटकर, इमरान तडवी, शाहरूख खाटीक, सलमान मोहम्मद कासीम, रिजवान उर्फ काल्या गयासोद्दीन शेख (सर्वांचे पूर्ण नाव माहीत नाही) यांच्यासह इतर ३० ते ४० जणांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, बुधवारी दिवसभर पोलिसांनी संशयितांची धरपकड सुरू केली होती. रात्रीपर्यंत नऊ तरुणांना ताब्यात घेऊन त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू होते.