जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२१ । पाचोरा तालुक्यातील वरखेडी (भोकरी) येथील पी.डी.बडोला माध्यमिक विद्यालयात भारतीय घटनेचे, शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती साजरी करण्यात आली.
विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.सी.चौधरी यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन ,माल्यार्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले.कोरोनाचा कहर सुरू असल्याने शासनाच्या नियमानुसार साजरी करण्यात आली. यावेळी पर्यवेक्षक एस. के.पाटील, एल.जे.जुमळे,एन.एल.कुमावत,सहकारी शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
तसेच येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक विद्या मंदीर येथेही, शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करत सरपंच अलकाताई विसपुते, उपसरपंच धनराज पाटील, सदस्या प्रतिभा पाटील,सविता पाटील, आशा भोई, माजी सरपंच धनराज विसपुते, चंद्रकांत पाटील, विजय भोई, संजय पाटील, राकेश पाटील प्रभारी केंद्रप्रमुख राहुल पाटील, उपशिक्षक संजय चांदणे, धर्मराज देवरे या सर्वांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन माल्यार्पण करून अभिवादन केले.