जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२२ । सलमान खानचा धाकटा भाऊ सोहेल खान आणि त्याची पत्नी सीमा खान यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. लग्नाच्या २४ वर्षानंतर दोघं घटस्फोट घेत आहेत. दोघांनी घटस्फोटासाठी मुंबईच्या कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला आहे. शुक्रवारी सोहेल आणि सीमा कौटुंबिक न्यायालयाबाहेर दिसले. दोघेही स्वतंत्रपणे कोर्टातून बाहेर पडले. दोघांनीही लग्न मोडण्याचा निर्णय घेतल्याच्या वृत्तामुळे सोहेल आणि सीमाच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
काही वर्षांपूर्वी सोहेलचा भाऊ अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचाही घटस्फोट झाला होता. खान कुटुंबासाठी हा मोठा आघात आहे. सलमाननं हे नातं टिकावं म्हणून खूप प्रयत्न केले होते. पण काही उपयोग झाला नाही.
कोण आहे सीमा खान?
सीमा खानचे खरे नाव सीमा सचदेव आहे. ती व्यवसायाने फॅशन डिझायनर आणि स्टायलिस्ट आहे. सीमाने स्वत:चे कॅलिस्टा नावाचे सलूनही उघडल्याचे वृत्त आहे. सुझैन खान आणि महीप कपूर यांच्यासोबत त्यांनी मुंबईतील वांद्रे येथे 190 लक्झरी बुटीक उघडले.
१९९८ मध्ये प्रेमविवाह केला होता
सोहेल आणि सीमा यांचा प्रेमविवाह झाला होता. दोघांची प्रेमकहाणी एखाद्या सिनेमाच्या कथेपेक्षा कमी नाही. सीमा ही मुळची दिल्लीची आहे. फॅशन जगतात नाव कमवण्यासाठी ती मुंबईत आली होती. रिपोर्टनुसार, दोघांची पहिली भेट चंकी पांडेच्या साखरपुड्याच्या पार्टीमध्ये झाली होती. सोहेल पहिल्या नजरेतच सीमाच्या प्रेमात पडला होता. यानंतर दोघांचं प्रेम घट्ट झालं आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
मध्यरात्री केलं लग्न
धर्म वेगवेगळे असल्यामुळे सोहेल आणि सीमा यांच्या लग्नात अनेक अडचणी आल्या. यामुळे मध्यरात्री मौलवीला बोलावण्यात आले आणि रात्रीच त्यांनी निकाह केला होता. त्यानंतर दोघांनी आर्य समाज मंदिरात दुसरं लग्न केलं. सीमाच्या आईवडिलांचा लग्नाला विरोध होता.
घर सोडून सीमा पनवेलला रहात होती
सोहेलचं घर सोडल्यानंतर सीमा पनवेलच्या फार्म हाऊसमध्ये रहात होती, असं तिनं सांगितलं होतं. तिथे तिचे सासू-सासरेही होते.