जळगाव लाईव्ह न्युज | नालेसफाई विशेष | महापालिका प्रशासनातर्फे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई मोहीम राबवली जाते. यंदा या मोहीमेला मे महिन्याच्या अखेरीस सुरुवात होणार आहे. यासंदर्भात चे निविदा मनपा प्रशासनातर्फे काढण्यात आले आहेत संबंधित ठेकेदार यांनी या निविदा भरल्या जात असे मनपा प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.
पावसाळ्यामध्ये गेल्या काही वर्षात आपत्ती व्यवस्थापनात मनपा प्रशासनाने सपाटून मार खाल्ला आहे. जळगाव शहरात घाणीचे साम्राज्य असतं. पावसाळ्याआधी नाले सफाई केली नाहीतर पावसाळ्यात नाल्याचं पाणी वस्तीमध्ये घुसायची दाट शक्यता आहे. अशावेळी येत्या दोन आठवड्यात जर सांगितल्याप्रमाणे नालेसफाईचे काम सुरू झाले नाही. तर मात्र पावसाळ्यामध्ये नागरिकांचे चांगलेच हाल होणार आहेत.
योग्य वेळी आणि योग्य रित्या नालेसफाई झाले नाही तर त्याचा त्रास नागरिकांना पावसाळ्यात सहन करावा लागतो. नालेसफाई न झाल्याने नाला तुम तो व नाल्याचे पाणी बाहेर येते परिसरात रोगराई पसरण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे नागरिकांच्या हितासाठी पावले उचलत प्रशासनाने लवकरात लवकर नालेसफाईचे काम हाती घ्यावे व ते पूर्ण करावी अशी नागरिकांची इच्छा आहे.