जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मे २०२२ । यंदाचा उन्हाळा जळगावकरांना चांगलाच हैराण करणारा ठरतोय. विदर्भापेक्षाही यंदा जळगाव जिल्हा तापताना दिसतोय. कारण सलग दुसऱ्या दिवशी राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद जळगाव जिल्ह्यात झाली आहे. भुसावळात रविवारी यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वोच्च ४६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
यंदाच्या उन्हाळ्यातील ६ एप्रिल रोजी ४४.८ अंशांच्या तापमानाचा उच्चांक होता. तर शनिवारी (दि.७) हा उच्चांक मोडीत काढून शहराने ४५.४ अंशांचा पारा काढला होता. तर रविवारी पुन्हा ०.८ अंशांची वाढ होऊन पारा थेट ४६.२ अंशांवर पोहोचला आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटेमुळे जळगावकर होरपळून निघत आहे. भुसावळात यापूर्वी १७ मे २०१६ रोजी सर्वाधिक ४८ अंश तापमानाची नोंद झाली होती.
भुसावळसह जिल्ह्यात सकाळ १० वाजेपासूनच तापमानाचा पारा ४० अंशावर जात असल्याने नागरिकांना हा उष्मा असह्य झाला आहे. दिवसा घराबाहेर न पडण्याबरोबरच थंडगार फळांबरोबर कोल्ड्रींक्स, ताक, सोलकडी, माठातील पाण्याने गारवा शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. सायंकाळच्या वेळेस देखील तापमानाचा पारा ४० अंश पर्यंत राहत असून उष्ण वाऱ्यामुळे उष्णतेच्या झळा जाणवत आहे. दरम्यान, पुढील चार ते पाच दिवस विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
जळगावातील आजचे दिवसभरातील तापमान (Jalgaon Temperature) असे?
वेळ – अंश
१० वाजेला – ४० अंश
११ वाजेला – ४१
१२ वाजेला – ४२ अंश
१ वाजेला- ४३ अंशापुढे
२ वाजेला – ४३ अंश
३ वाजेला – ४४ अंशापुढे
४ वाजेला – ४४ अंश
५ वाजेला – ४४ अंश
६ वाजेला – ४३ अंश
७ वाजेला – ४१ अंश
आणि रात्री ८ वाजेला ३९ तर रात्री ९ वाजेला ३८ अंशावर स्थिरावणार.