⁠ 
रविवार, डिसेंबर 15, 2024
Home | जळगाव जिल्हा | Exclusive : मनपा आयुक्त विद्या गायकवाड यांच्या निवडीने शिवसेनेचा एक गट नाराज

Exclusive : मनपा आयुक्त विद्या गायकवाड यांच्या निवडीने शिवसेनेचा एक गट नाराज

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । चिन्मय जगताप । विद्या गायकवाड ५ मे रोजी जळगाव शहर आयुक्तपदी विराजमान झाल्या. विद्या गायकवाड आयुक्त व्हाव्यात यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्फत फिल्डिंग लावण्यात आली होती. विद्या गायकवाड यांनी गेल्या सहा महिन्यापासून मनपा मध्ये केलेल्या चांगल्या कामा मुळेच त्यांना आयुक्त पद मिळाले अशी चर्चा मनपा वर्तुळात आहे. मात्र विद्या गायकवाड आयुक्त झाल्याने शिवसेना व भाजपा बंडखोरांतील एक गट नाराज असल्याचे म्हटले जात आहे.

वर्षभरापूर्वी भाजपाचे नगरसेवक फोडत शिवसेनेने जळगाव शहर महानगरपालिकेवर आपला भगवा फडकवला. यावेळी आयुक्त सतीश कुलकर्णी असताना कित्येकदा सेना नगरसेवकांचे त्यांच्यासोबत झालेले वाद हे सर्वश्रुत आहेत.याच बरोबर बंडखोरांनी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या निवृत्ती कार्यक्रमावेळेस बंडखोरांनी घातलेला राडा सुद्धा चर्चेचा विषय ठरला होता. कारण आयक्तअसताना सतीश कुलकणी यांनी आम्हाला वेळ दिला नाही शहराच्या विकासाची कामे केली नाहीत असेही म्हटले होते. यामुळे जो नवीन आयुक्त येईल तो आयुक्त एक चांगला आयएएस दर्जाच्या अधिकारी व्हावा अशी मागणी शिवसेना – बंडखोरांतर्फे करण्यात आली होती. मात्र आता विद्या गायकवाड यांनाच आयुक्त केल्याने शिवसेना – बंडखोर गटातील एक गट नाराज असल्याची चर्चा मनपा वर्तुळात सुरू आहे.

विद्या गायकवाड यांची नुकतीच मनपा आयुक्तपदी वर्णी लागली आहे. असे जरी असले तरी विद्या गायकवाड हे आयुक्त म्हणून नक्की कशा प्रकारे काम करू शकतील याबाबत कोणालाच शाश्वती नसल्याने आपली कामे होतील की नाही असा प्रश्न शिवसेना – बंडखोर नगरसेवकांना पडला आहे. ज्यामुळे हि नाराजी आहे असे म्हटले जात आहे.

याबाबद जेष्ठ नगरसेवक नितीन लड्ढा यांनी प्रतिक्रिया दिली कि, अजून पर्यंत कोणीही नाराजी व्यक्त केलेली नाही. शेवटी विद्या गायकवाड यांची नियुक्ती महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात आलेली आहे लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे काम हे वेगवेगळे असते. त्यामुळे या मध्ये कोणाची नाराजी असल्याचे न दिसून आले ना नाराजी असण्याचे कोणतेही कारण आहे

याच बरोबर बंडखोर नगरसेवक ऍड दिलीप पोकळे यांनी बोलताना सांगितले कि, विद्या गायकवाड या आयुक्त झाल्याने जळगाव शहराचा विकास होणार आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे कोणीही नाराज नाही.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह