जागतिक ॲथलेटिक्स दिनानिमित्त उदबोधन, प्रशिक्षण वर्गाचे आयोजन
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मे २०२२ । निरोगी आणि तंदुरुस्त भविष्यासाठी विद्यार्थ्यांनी खेळाची आवड निर्माण करून मोबाइलच्या अति वापरापासुन दुर रहाने गरजेचे असून जागतिक ॲथलेटिक्स दिन हा एक यशस्वी उपक्रम असल्याचे मत चोपडा तालुका ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव देविदास महाजन यांनी व्यक्त केले.
झि.तो.म.माध्यमिक व ना.भा.पा. ज्युनियर कॉलेज धानोरा येथे चोपडा तालुका ॲथलेटिक्स असोसिएशन व सातपुडा क्रिडा प्रसारक मंडळ धानोराच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ॲथलेटिक्स दिन निमित्तानेॲथलेटिक्स उदबोधन, प्रशिक्षण वर्ग व सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ग.स.सोसायटीत नवनिर्वाचित सदस्य मंगेश भोईटे यांच्या हस्ते क्रिडा साहित्य व मैदान पूजन करण्यात आले. क्रिडा शिक्षक देविदास महाजन यांनी ॲथलेटिक्स दिन विषयीं माहिती देऊन आयुष्यातील खेळाचे महत्व विषद केले. विद्यार्थ्यान्ना विविध प्रकाराचे प्रात्यक्षिक दाखवुन सराव करून घेतला. जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव प्रा.राजेश जाधव यांच्या प्रेरणेने उदबोधन वप्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. विद्यालयाचे चेअरमन सुखदेवराव पाटील, प्राचार्य के. एन. जमादार, सातपुडा क्रिडा प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माणिकचंद महाजन, सातपुडा शिक्षण संस्थेचे सदस्य जगदिश पाटील, जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे कार्यवाहक कैलास महाजन, पर्यवेक्षक के. पी. बडगुजर, वाय. सी. पाटील, एस पी महाजन, आर बी साळुंके, एस. सी. पाटील, एस. एस. पाटील, ए. एस. पाटील, एम. व्ही. महाजन, रेखा महाजन आदी उपस्थित होते.