जळगाव शहरात नळ जाेडणीसाठी १२०० प्रस्ताव प्राप्त
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मे २०२२ । शहरातील जुन्या पाणीपुरवठा वितरण व्यवस्थे वरून नव्याने सुरु होत असलेल्या अमृत जलवाहिनीवर संयोजन देण्यासाठी महापालिकेतर्फे शुक्रवार ६ मे ही अंतिम तारीख देण्यात आली होती.
परंतु पालिका पाणी पुरवठा विभागाला अपेक्षित असणाऱ्या सुमारे १६ हजार नळ जोडणींचे प्रस्तावाच्या १० टक्केही प्रस्ताव प्राप्त झालेली नाही. शुक्रवारी सुमारे १२०० प्रस्ताव प्राप्त झाल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले. शहराच्या विविध भागातील नव्याने उभारण्यात आलेल्या अपार्टमेंटमधील चार शिष्टमंडळांनी याबाबत फेरविचार व्हावा, यासाठी आयुक्त यांची निवेदन देऊन भेट घेतली.
अमृत पाणीपुरवठा योजनेतून नळ जोडणी करताना अपार्टमेंटबाबत धोरणाचा फेर विचार करावा. तसेच त्यासाठी मुदतवाढ द्यावी, या मागणीचे निवेदन शहरातील वेगवेगळ्या भागातील चार अपार्टमेंटमधील शिष्टमंडळांनी शुक्रवारी महापालिका आयुक्तांना भेट घेऊन दिले.