---Advertisement---
जळगाव जिल्हा जळगाव शहर बाजारभाव बातम्या महाराष्ट्र

बोंबला ! लसणाने गाठला दरवाढीचा कळस, आताचा प्रति किलोचा भाव वाचा?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जून २०२४ । गेल्या वर्षी देखील लसणाने ग्राहकांच्या खिशाला चांगलाच फटका दिला होता दरवाढीने मोठी उंची गाठली होती. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात या दरवाढीचा फटका बसला होता यामध्ये कांदा टोमॅटो आणि बटाटा यांनी देखील दरवाढीत मोठी झेप घेतली होती. त्यानंतर लसणाने देखील दरवाढीची मोठी उंची गाठली होती. आता परत पावसाळ्याच्या तोंडावर लसणाने दरवाढी चा फटका ग्राहकांना दिला आहे. नवी मुंबईतील बाजार समितीमध्ये 85 ते 210 रुपये किलो भाव असून, गेल्यावर्षी वर्षाच्या अखेरीस लसणाचे दरवाढ झाले होते. परंतु यावर्षी हंगामाच्या सुरुवातीपासूनच दर वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.

Add a subheading 2 jpg webp

मागील वर्षापेक्षा भाव दुपटीने

मागील वर्षी जूनच्या सुरुवातीला बाजार समितीमध्ये लसूण हा 40 ते 65 रुपये किलो दराने विकला जात होता परंतु यावर्षी 85 ते 210 रुपयांवर लसणाचे दर पोहोचले आहेत. किरकोट मार्केटमध्ये 280 ते 300 रुपये किलो दराने लसूणची विक्री होत असून, प्रत्येक वर्षी जानेवारीमध्ये लसूणचा हंगाम सुरू होतो, व तो जून पर्यंत घसरत असतो. परंतु यावर्षी हंगामाच्या सुरुवातीपासूनच लसूण च्या दरात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झालेली बघायला मिळत आहे.

---Advertisement---

दर वाढीचे कारण काय?

देशात महागाईचा आलेख चढतच राहिला आहे परंतु यावर्षी लसुन चे उत्पादन कमी झाल्यामुळे हा फरक पडला आहे दिवाळीच्या दरम्यान काही प्रमाणात दर कमी होतील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. यात आता भाजीपाला देखील महागल्याने ग्राहकांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे. यावर आता केंद्र सरकारने लवकरच याची दखल घेणे गरजेचे आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये लसणाचे दर सर्वाधिक होते याचे कारण म्हणजे प्रतिकूल हवामान आणि अवकाळी पावसाचा मोठा फटका त्यावेळी बसला होता. त्याप्रमाणेच आता देखील पावसाळ्याच्या तोंडावर पुन्हा एकदा लसणांच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---