जळगाव लाईव्ह न्युज | ६ मे २०२२ | केंद्र शासन व राज्य शासनाच्या माध्यमातून पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यातयेते. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत मनपाला 73 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता ज्यातून मनपाच्या मुख्य इमारतीत अनेक मजल्यांवर दहा लाख रुपयांच्या निधीतून वर्टीकल गार्डन मनपाने उभारले होते मात्र ते दहा लाख रुपये आता पाण्यात गेली असून वरील ठिकाणी गार्डन पूर्णपणे कोमजले आहे.
राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत शासनाने पब्लिक प्लेसेस अर्थात गर्दीच्या ठिकाणी प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन निर्मिती वाढावी या उद्देशाने वर्टीकल गार्डनची संकल्पना राबवली होती. मनपात देखील चाळीस फुटांचे स्टॅन्ड तयार करून ऑक्सिजन देणाऱ्या रोपांची लागवड करण्यात आली होती मात्र या व्हर्टिकल गार्डन कडे मनपा प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याने आता हे व्हर्टिकल गार्डन कोमजले आहे. ते व्हर्टिकल गार्डन इतके कोमजले आहे की, ऑक्सीजन तर सोडा सोड्यासाठी लागणारा कार्बन-डाय-ऑक्साईड सुद्धा ती झाडं देऊ शकत नाहीत.
जळगाव शहरातील नागरिकांना मनपा मध्ये आल्यावर त्यांना ऑक्सिजन मिळावा हा या त्यांचा उद्देश होता मात्र जळगाव मनपाच्या अक्षम्य दुर्लक्ष यामुळे हे व्हर्टिकल गार्डन आता कोमजले आहे