उन्हाच्या तडाख्यामुळे केळी कोमेजली, शेतकरी आणखीन संकटात

मे 6, 2022 11:47 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मे २०२२ । यंदा मार्च महिन्यापासूनच उन्हाचा तडाखा जाणवत आहे. एप्रिल महिना चांगलाच तापला तर मे सुरू होताच सूर्य जणू अक्षरशः आग ओकत असल्याचे जाणवत आहे. रणरणत्या उन्हामुळे सावदा व परीसरातील केळी उत्पादे शेतकरी चांगलाच होरपळून निघाला आहे. शिवाय शेतात असलेली उभी केळी तळपत्या उन्हाने अक्षरशः कोमेजत आहे. या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहे.

banana tree

यंदा मार्च महिन्यात तापमाचा पारा ४० अंशावर गेला होता. त्यानंतर तो एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तो वाढून ४४ ते ४५ अंशावर स्थिराला. त्या काही दिवसात हा पारा आणखीन चढत जाणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे त्यामुळे यंदा केळी या उन्हात टिकवणे अवघड झाले आहे. झाडावरून केळी घड मोठ्या प्रमाणत निसटत असल्याने तसेच केळी झाड उन्हामुळे शेकली जात असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. आधीच केळीस भाव नसल्याने शेतकरी संकटात असतांना आता या नैसर्गिक परीस्थितीमुळे शेतकरी आणखीन जास्त संकटात सापडला आहे.

बचावासाठी शेतकर्‍यांकडून अनेक उपाययोजना
उन्हापासून बचावासाठी शेतकरी अनेक उपाययोजना आपल्या केळी बागांभवती करीत आहे. कुणी शेताच्या बाजूने हिरवी नेट लावत आहे तर कुणी जुन्या साड्या वापरून उन्हापासून बचाव करण्याचा प्रयत्न करीत आहे तर कुणी शेताभोवती उंच वाढणारे गवत वा सायरी लावून उन्हाचा बचाव करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत मात्र उन्हाचा तडाखा एव्हढा आहे की या उपाययोजना सुद्धा फोल ठरून शेतकर्‍यांचे मोठे नुकसान उन्हामुळे होत आहे. आगामी काही दिवस केळीसाठी अधिक धोक्याचे ठरण्याची शक्यता आहे.

पीक विमा योजनेंतर्गत मिळावी भरपाई
अशाी परीस्थितीत आता शेतकरी पीकविमा योजनेंतर्गत उच्च तापमानाची नोंद घेऊन त्या निकषानुसार केळी उत्पादक शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळते का? याबाबत देखील आशा लागली आहे. यंदा उन्हामुळे झालेले नुकसान मोठे असून अश्यावेळी केळी पीकविमा हा शेतकर्‍यास मिळावा, अशी रास्त अपेक्षा शेतकरी आता व्यक्त करीत आहे. लोकप्रतिनिधींनीदेखील लक्ष देऊन शेतकर्‍यांना शासकीय मदत अथवा केळी पीकविमा रक्कम मिळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now