जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । शहरातील शेतकरी किशोर देवराम राणे यांची बुधवारी कापणी झालेली २० टन केळी थेट इराण येथे निर्यात केली जात आहे. ही जी-नाईन व्हरायटीची केळी असून निर्यातीमुळे बाजारभाव पेक्षा क्विंटल मागे ५०० रूपये जास्तीचा भाव मिळाला आहे.
केळीवर वारंवार वेगवेगळी संकटे, आपत्ती कोसळते. तरीही खचून न जाता अनेक शेतकरी उच्च दर्जाची केळी पिकवतात. या केळीला विदेशातून मागणी होते. भाव देखील चांगला मिळतो. मात्र, त्यासाठी शेतकऱ्यांनी पारंपारीक पद्धतीने बदल करणे आवश्यक आहे. त्यानुसार शहरातील शेतकरी किशोर देवराम राणे यांनी कोल्हापूर येथील अंकुश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जी-नाईन व्हरायटी-च्या टिशू रोपांची आपल्या शेतात पाच बाय बाच फुटाचा मोठा गाला तयार करून त्यात टिशू रोपांची लागवड केली. वेळोवेळी खते, फवारणी व पाण्याचे योग्य नियोजन केले. यानंतर तयार झालेली निर्यातक्षम आहे किंवा नाही? याची तपासणी करून घेतली. यानंतर बुधवारपासून तंत्रशुद्ध पद्धतीने २० टन केळी कापणी झाली. निर्यातीच्या दृष्टीने आवश्यक प्रक्रिया करत ही केळी थेट इराणमध्ये रवाना होणार आहे. दरम्यान या केळीला बाजारभावापेक्षा क्विंटल मागे ५०० रूपये जास्तीचा भाव मिळाल्याने केळी उत्पादकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
४ लाख केळी खोडावर लक्ष
तालुक्यात पोलाड ॲग्रो मिनरल कोल्हापूर यांचे प्रतिनिधी अंकुश जाधव यांच्या माध्यमातून न्हावी येथील शेतकरी निलेश वाघुळदे, सातोद येथील बाळू अभिमन पाटील, पिळोदा येथील दीपक पाटील, साकळी येथील सुबोध मुजुमदार सह आदी शेतकऱ्यांच्या शेतात लागवड केलेल्या तब्बल ४ लाख केळी खोडव्दारे निर्यातक्षम केळी उत्पादन मिळवण्या करीता परिश्रम घेत आहे.
कापणीची पध्दत पिलबाग,शिल्लक खोड करीता उपयुक्त
केळी कापणी करतांना केळीचे झाड कापले जात नाही परिणामी केळीच्या उभ्याझाडाला ज्या मात्रेत खत पुरवठा व मिनरल दिले असतात ते खोडा जवळील पिल ला मिळतात व पिल बाग उत्पन्न चांगले येते तर उभ्या असलेल्या झाडा मुळे शेताची धुप कमी होत शेतात ओलावा राहतो आणी शिल्लक खोडाचे उत्पादन चांगले येते.