दुर्दैवी : उकळते पाणी अंगावर पडल्याने १ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मे २०२२ । यावल तालुक्यातील एका गावात राहणारी १ वर्षाच्या चिमुकलीच्या अंगावर उकळते पाणी पडून गंभीर भाजली गेली होती. १२ दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. आरती कैलास भील (वय-१) असे मयत झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

kid death

अधिक माहिती अशी की, तालुक्यातील मालोद येथे आरती भील ही चिमुकली आपल्या आईवडीलांसह वास्तव्याला आहे. आईवडील हे शेतात मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. २१एप्रिल रोजी सकाळी घरात चुलीवर अंघोळीसाठी पाणी तपाविण्यासाठी ठेवले होते. त्यावेळी चिमुकली खेळत असतांना अचानक चुलीवरील भांड्यातील उकळते पाणी खाली पडल्याने बाजूला असलेली आरती ही गंभीररित्या भाजली गेली. तिला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.

१२ दिवसांपासून चिमुकलीची मृत्यूशी असलेली झुंज संपली. सोमवारी २ मे रोजी रात्री ११.३० वाजता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे भील कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून झीरो नंबरने यावल पोलीसात नोंद वर्ग करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोहेकॉ अनिल फेगडे करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now