जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२२ । ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरदार वल्लभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय येथे एम.एस्सी.च्या विद्यार्थ्यांसाठी नुकतीच योग प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.जे.बी.अंजने हे होते. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. के.जी .कोल्हे, प्रमुख पाहुणे डॉ.आर.व्ही.भोळे तसेच डॉ. एस. एन. वैष्णव व कार्यक्रमाचे आयोजन समितीचे सदस्य डॉ.सचिन झोपे उपस्थित होते. योग प्रशिक्षण कार्यशाळेत डॉ.के.जी.कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व व फायदे सांगितले. योगा दररोज केल्याने आपले शरीर व मन चांगले राहते. त्यासाठी नियमित योगासने केली पाहिजे असे सांगितले. प्राचार्य डॉ. जे. बी.अंजने यांनी मार्गदर्शन केले. डॉ. सचिन झोपे यांनी सूत्रसंचालन केले. आभार डॉ. एस.एन.वैष्णव यांनी मानले.