जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल शहरात शुक्रवारी ‘सिंगल युज प्लास्टिक’ या मोहिमेची यावल नगरपरिषद मार्फत अमलबजाणी करण्यात आली. तसेच शहरातील विविध परिसरातून तब्बल २० किलो कॅरीबॅगसह प्लास्टिक च्या वस्तू जप्त करण्यात आल्या असून या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
शासनाच्या नियमानुसार ५० मायक्रोनपेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक वापर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे येथील नगर परिषदे मार्फत शुक्रवारी मोहिम राबवण्यात आली. शहरातील बारीवाडा चौक, बुरुज चौक, राजस्थानी स्वीट, भुसावल टि पॉइंट, आठवडे बाजार अश्या विविध ठिकाणी कार्यवाही करण्यात आली. त्यात सुमारे २० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून संबंधित व्यक्तींना परत असे प्लास्टिक वापरू नये अशी समज देण्यात आली. जर परत त्यांनी प्लास्टिक वापरल्याचे आढळून आल्यास पाच हजारांचा दंड करण्यात येईल असे सूचित करण्यात आले आहे. सदर कार्यवाही नगर पालिकेचे मुख्याधिकारी मनोज म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख स्वप्नील म्हस्के, तुकाराम सांगळे, सुनील उंबरकर, मधुकर गजरे, रवींद्र बारी, संतोष अनिल चौधरी, नन्नवरे, मोबीन शेख, नितीन पारधे, लखन घारू आदी कर्मचाऱ्यांनी केली.