जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२२ । येथील महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेतर्फे दि १ ते ७ मे दरम्यान अस्थिरोग व आरोग्याबद्दल जनजागरण अभियान राबवण्यात येणार आहे. यावेळी तज्ज्ञ व्यक्ती विविध विषयांवर ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र सरोदे यांनी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
अस्थिरोग संघटनेतर्फे दररोज सायंकाळी ५ ते ७ यावेळेत कार्यक्रम होणार असून अभियानाचे उद्घाटन १ मे रोजी होणार आहे. यावेळी महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेचे अध्यक्ष डॉ.वासुदेव गाडेगोने, सचिव डॉ. नारायण कर्णे, उपाध्यक्ष डॉ.प्रमोद शिंदे उपस्थित राहणार आहे. यानंतर आठवडाभर यू-ट्यूब लिंकद्वारे नागरिकांना व्याख्यान ऐकता येणार आहे. यात दररोज हाडांचे आजार, त्याची कारणे आणि घ्यावयाची काळजी या तिन्ही विषयांना अनुसरून तज्ज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करणार आहे.
४ मे रोजी ऑफलाइन कार्यक्रम : दररोज दोन सत्रात व्याख्यान होणार असून, ४ मे रोजी ऑफलाइन कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. यात शहरातील भाऊंचे उद्यान येथे सायंकाळी ७ वाजता येथे डॉ.ज्योती गाजरे, डॉ. मनीष चौधरी, डॉ. निरंजन चव्हाण, डॉ. पराग नाहाटा हे शस्त्रक्रियेशिवाय गुडघेदुखी टाळा, हाडांच्या ठिसूळपणापासून बचाव, आधुनिक जीवनशैली काळाजी गरज याविषयावर मार्गदर्शन करणार आहे, पत्रकार परिषदेस संघटनेचे सचिव डॉ.भूषण झंवर, विभागप्रमुख डॉ. सुनील नाहाटा, विनोद जैन, आयएमएचे सचिव डॉ. जितेंद्र कोल्हे यांची उपस्थिती होती.