⁠ 
रविवार, सप्टेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | कोळसा चोरणाऱ्यास रंगेहात पकडले; गुन्हा दाखल

कोळसा चोरणाऱ्यास रंगेहात पकडले; गुन्हा दाखल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२२ । अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील एमआयडीसीत कोळसा चोरण्यासाठी आलेल्या औरंगाबादच्या दोघांना, २६ रोजी रात्री रंगेहाथ पकडण्यात आले. ज्ञानोबा गंगाराम धुमाळ व शरद छगन खरात (दोन्ही रा.औरंगाबाद) अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी येथील पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

अधिक माहिती अशी की, प्रसन्न प्रकाश शहा यांचा मंगरूळ येथील एमआयडीसीत कोळशाचा डेपो आहे. ५ एप्रिल रोजी रात्री त्यांच्या कोळश्याच्या डेपोमधून सुमारे १ लाख ७० हजार रुपये किमतीचा २ हजार ५०० किलो कोळसा चोरीस गेला होता. म्हणून प्रसन्न शहा, त्यांचे वडील प्रकाश शहा, मित्र सचिन शिंदे यांनी पाळत ठेवली होती. २६ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास एक टेम्पो (क्र. एम.एच.२०-ई.एल.५२६३) घेऊन दोन जण आले. कोळश्याच्या ढिगाऱ्यावर ते कोळसा काढण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी दोघांना पकडण्यात आले. ज्ञानोबा गंगाराम धुमाळ व शरद छगन खरात (दोन्ही रा.औरंगाबाद) अशी संशयितांची नावे आहेत. दोघे संशयित यापुर्वी शहा यांच्याकडे कोळसा घेण्यासाठी येत होते. दोघांनी ५ एप्रिलला २५०० किलो कोळसा चोरल्याची कबुली दिली. त्यांच्या टेम्पोमध्ये ५० पोते, कोळसा भरण्याचा फावडा असे साहित्य आढळून आले. प्रसन्न शहा यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह