जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२२ । पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरांबाबत तूर्त ‘जैसे थे’ची भूमिका घेतली आहे. आज सलग २१ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाहीय. यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
कंपन्यांनी जारी केलेल्या दरांनुसार आज जळगावमध्ये (Jalgaon) एका लिटर पेट्रोलचा दर 121.69 रुपये इतका आहे. तर डिझेलचा दर 104.34 रुपये इतका आहे.राष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर 7 एप्रिलपासून स्थिर आहेत. अशा स्थितीत वाहनांच्या इंधनाच्या किमतीत महागाईचा फटका बसलेल्या जनतेला पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल न झाल्याने थोडासा दिलासा जाणवत आहे.
बड्या शहरातील दर
मुंबईमध्ये पेट्रोल, डिझेलचा दर अनुक्रमे 120.51 आणि 104.77 रुपये एवढा आहे. तर राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 105.41 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 96.67 रुपये एवढा आहे. पुण्यात पेट्रोलचा भाव प्रति लिटर 120.30 रुपये असून, डिझेल 104. 30 रुपयांवर पोहोचले आहे. नागपूरमध्ये पेट्रोलचे भाव प्रति लिटर 120.15 तर डिझेल 102.89 रुपये लिटर आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोल 120.15 तर डिझेल 104.40 रुपये लिटर आहे.
गेल्या महिन्यात जळगावमध्ये पेट्रोलचा दर 111.29 रुपये प्रति लिटर इतका होता, त्यानंतर 22 मार्चपासून पेट्रोल दर सलग वाढत गेले. 1 एप्रिलला पेट्रोल 117.93 रुपये प्रति लिटरवर पोहोचले होते. तर 6 एप्रिलपर्यंत वाढत ते 121.69 पोहोचले. तेव्हापासून पेट्रोल दर स्थिर आहे. एका महिन्यात पेट्रोल जवळपास 10 रुपयाने महागले आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज अपडेट केले जातात
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज अपडेट केली जाते. तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीची माहिती अपडेट करतात.