⁠ 
बुधवार, डिसेंबर 11, 2024
[aioseo_breadcrumbs]

चोरीचा प्रयत्न करणारे पोलिसांच्या जाळयात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज। २५ एप्रिल २०२२ । जामनेर तालुक्यातील मालदाभाडी येथे डेअरीचे दुकान फोडून चोरी करण्याच्या प्रयत्नात आलेल्या एकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून अन्य दोघे मात्र पसार झाले आहेत.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार की, दाभाडी येथे होनेस्त डेअरी प्रायव्हेट लिमिटेड हे दुकान असून याठिकाणी कंपनीचे तांब्याची वायरी, लोखंडाचे तुकडे व इतर मशिनरी सामान पडलेला आहे. दरम्यान दि २४ एप्रिल रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास संशयित रवींद्र उर्फ आरू अरूण वाघोदे रा. मोताळा जि. बुलढाणा ह.मु. सुप्रीम कॉलनी जळगाव, राकेश गोकुळ राठोड आणि उमेश आठे दोन्ही रा. सुप्रीम कॉलनी यांनी दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश करीत पेटीचे कुलूप तोडले. यातून सामान चोरून नेण्याचा प्रयत्न करत होते. हि घटना येथील सेक्युरिटी गार्ड गजानन जयराम काळे यांच्या लक्षात आली. त्यावेळी त्यांनी आरडाओरड केली असता इतर दोन जण पसार झाले तर संशयित अरविंद वाघोदे याला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेसंदर्भात गजानन काळे यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय पाटील हे करीत आहेत.