जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२२। येथील केसीई अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागामार्फत प्राध्यापकांसाठी रिपोर्ट रायटिंग युजिंग लॅटेक्स शॉर्टटर्म ट्रेनिंग प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी ५० प्राध्यापकांनी या प्रोग्राममध्ये सहभाग नोंदवला. कार्यशाळा १८ ते २२ एप्रिलदरम्यान घेण्यात आली. कार्यशाळेत प्रा. अविनाश सूर्यवंशी यांनी लॅटेक्स सॉफ्टवेअरचा उपयोग कसा करावा? या विषयावर मार्गदर्शन केले. लॅटेक्स सॉफ्टवेअरचा उपयोग करून अंतिम वर्षाचा प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करावा याबद्दलची माहिती प्राध्यापकांना दिली. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी प्राचार्य डॉ. संजय सुगंधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे व्यवस्थापन प्रा. अविनाश सूर्यवंशी, प्रा. पुजा नवाल, प्रा. हर्षा तळेले यांनी केले. यशस्वीतेसाठी प्रा. संजय दहाड, प्रा. डॉ. प्रज्ञा विखार, विभागप्रमुख प्रा. मिनल कोल्हे आदींनी परिश्रम घेतले.