⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | कोरोना | जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप ; आज १२०१ नव्या रुग्णांची नोंद

जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप ; आज १२०१ नव्या रुग्णांची नोंद

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२१ । जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. जिल्ह्यातल्या विविध तालुक्यात कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. आज सोमवारी जिल्ह्यात १२०१ नवे रुग्ण आढळून आले आहे.  त्यात जळगाव शहरासह भुसावळ, अमळनेर, रावेर मध्ये अधिक रुग्ण आढळून आले आहे.

आज १२०१ रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या १ लाख ३ हजार ०९ इतकी झाली आहे. तर आज ११९५ कोरोना रुग्ण आजारातून बरे होऊन घरी गेले आहे. त्यामुळे आतापर्यंत बरे होणार्या रुग्णांची एकूण संख्या ८९ हजार ४६० वर गेली आहे.

दरम्यान, आज १६ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृताच आकडा १८०९ वर गेला आहे. जिल्ह्यात महिनाभरापासून वाढणाऱ्या संसर्गामुळे ॲक्‍टिव्ह रूग्‍णांचा आकडा देखील वाढत आहे. ११ हजार ७४० रुग्ण उपचार घेत आहे.

आज जळगाव शहर २१३, जळगाव तालुका ३३, भुसावळ १२४, अमळनेर २२०; चोपडा १०४; पाचोरा ६९; भडगाव १५; धरणगाव ३६; यावल ६६; एरंडोल ८१, जामनेर ३३; रावेर १२२, पारोळा ०९; चाळीसगाव ०४, मुक्ताईनगर ५६; बोदवड ०९ आणि इतर जिल्ह्यातील ०७ असे १२०१ रूग्ण आढळून आले आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.