जळगाव लाईव्ह न्युज | २१ एप्रिल २०२२| येत्या महाराष्ट्र दिनी म्हणजेच 1 मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे औरंगाबाद येथे मोठी सभा घेणार आहेत. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस नंतर आता शिवसेनेने देखील विरोध दर्शवला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या प्रखर हिंदुत्वाच्या भूमिकेनंतर संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरले आहेत. हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर महाराष्ट्रात कित्येक वर्षांनी हिंदुत्वाची भूमिका कोणीतरी मांडली आहे. या प्रखर हिंदुत्वाला राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध दर्शवला होता यानंतर आता शिवसेनेने देखील या सभेला विरोध दर्शवला आहे.
शिवसेनेचा मध्ये राज ठाकरे यांनी ‘संस्कृतिक मैदानावर’ सभा घ्यायला नको कारण त्या ठिकाणी हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक सभा गाजवल्या आहेत. आता राज ठाकरे यांना तिथे सभा घेण्याची परवानगी मिळायला नको. अशी मागणी शिवसेनेने केली आहे.