जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२२ । दरवर्षी सर्वाधिक चित्रपट देणारा बॉलीवूडचा सुपरस्टार म्हणजे अक्षय कुमार. अनेकदा त्याच्या चित्रपटांमुळे तो चर्चेत असतो. गेल्या अनेक दिवसांपासून अक्षय कुमार सोशल मीडियात पुन्हा चर्चेत आला असून फॅन्सने त्याला ट्रोल केले आहे. एका पान मसाला जाहिरातीवरून टीका झाल्यानंतर अक्षय कुमारने सोशल मीडियात जाहीर माफी मागितली असून एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. अक्षयकुमारने स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.
सुप्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार हा नेहमी विविध जाहिरातीत झळकत असतो. दरवर्षी काहीतरी वेगळ्या संकल्पना असलेल्या चित्रपटात झळकत अक्षयकुमार आपले वेगळेपण जपत असतो. समाजासाठी राबविल्या जाणाऱ्या उपक्रमात देखील अक्षयकुमारचा मोठा वाटा आहे. गेल्या काही महिन्यांपासून अक्षय कुमार एका पानमसाला जाहिरातीत झळकत आहे. अक्षय कुमारवर या जाहिरातीमुळे टीका होऊ लागली असून चाहत्यांनी त्याला सोशल मीडियात ट्रोल करण्यास सुरुवात केली होती.
अक्षयकुमारने त्याच्या अधिकृत ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली असून त्याने लिहिले, ‘मला माफ करा. मला माझ्या सर्व चाहत्यांची आणि हितचिंतकांची माफी मागायची आहे. गेल्या काही दिवसांपासून समोर आलेल्या तुमच्या प्रतिसादांनी मला खूप प्रभावित केले आहे. मी तंबाखूला कधीही मान्यता दिली नाही आणि करणारही नाही. या ब्रँडशी असलेल्या माझ्या संबंधाबाबत मी तुमच्या भावनांचा आदर करतो, म्हणून मी नम्रतेने माघार घेत आहे, असे त्याने म्हटले आहे.
अक्षयकुमारने केवळ माफीच मागितली नाही तर एक मोठा निर्णय देखील जाहीर केला आहे. तो म्हणाला, मी ठरवले आहे की, जाहिरातीसाठी मिळालेली फी मी चांगल्या कारणासाठी वापरेन. ब्रँड, त्याची इच्छा असल्यास, त्याच्या कराराची कायदेशीर मुदत पूर्ण होईपर्यंत ही जाहिरात प्रसारित करणे सुरू ठेवू शकते. पण मी वचन देतो की भविष्यात मी हुशारीने पर्याय निवडेन. त्या बदल्यात, मी नेहमीच तुमचे प्रेम आणि प्रार्थना मागतो, असे अक्षयकुमारने म्हटले आहे.
अक्षय कुमारच्या माफीनंतर चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव देखील सुरु केला असून तसे ट्विट केले जात आहे. इन्स्टाग्रामवर देखील चाहते अक्षयकुमारचे कौतुक करू लागले आहे.