⁠ 
शनिवार, जानेवारी 11, 2025
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | गुड न्यूज : जिल्ह्यातील २,२६० एसटी कर्मचारी कामावर परतले

गुड न्यूज : जिल्ह्यातील २,२६० एसटी कर्मचारी कामावर परतले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ एप्रिल २०२२ । नवीन बसस्थानकातील जळगाव आगारात सोमवारी एसटी कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. दिवाळीपासून एसटीचे रुतलेले चाक ४ हजारपैकी २ हजार २६० कर्मचारी कामावर परतल्र्याने सुरळीत धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाने कर्मचाऱ्यांना कामावर परतण्यासाठी २२ एप्रिल ही तारीख दिली होती. मात्र, जळगाव विभागातील सर्वच कर्मचाऱ्यांनी एकमताने निर्णय घेत सोमवारी हजर झाले. त्यामुळे एसटीचा चार हजार फेऱ्यांसह २ लाख ५० हजार किलोमीटर धावण्याचा मार्ग मोकळा झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला

जळगाव विभागात सोमवारी ४०७ चालक, २८९ वाहक, ३८ चालक-वाहक, १७३ कार्यशाळा कर्मचारी, २३ प्रशासकीय असे एकूण ९३० कर्मचाऱ्यांसह ८ ते १८ एप्रिलदरम्यान ६७० चालक, ५४८ वाहक, ४६ चालक-वाहक, ३१६ कार्यशाळा कर्मचारी, ३७ प्रशासकीय असे मिळून ५८० चालक, ६५३ वाहक, ४९ चालक-वाहक, यांत्रिक ६२२, प्रशासन ३५६ असे २ हजार २६० कर्मचारी कामावर परतले.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह