महाराष्ट्रराजकारण

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मला कोणीही माहिती पुरवली नाही : जेम्स लेनचा मोठा खुलासा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज | १८ एप्रिल २०२२ | पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं नुकतंच निधन झालं. बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिला व तो घरोघरी पोहोचवण्याच्या प्रयत्नही केला. गेल्या 70 वर्षांपासून ते हे काम नियमितपणे करत होते. मात्र २००१ आलेल्या जेम्स लेन यांच्या ‘शिवाजी’ या पुस्तकामुळे बाबासाहेब पुरंदरे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.

या पुस्तकात जेम्स लेन यांनी जिजामाता यांचा अवमान करत त्यांच्या चारित्र्यावर शंका घेण्याचा प्रयत्न केला होता. या पुस्तकावर महाराष्ट्रात बंदी देखील घालण्यात आली होती. जेम्स लेन यांनी पुस्तकांमध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आभार मानले होते. यामुळे बाबासाहेबांनी जेम्स लेन याला खोटी माहिती पुरवली असा प्रचार राष्ट्रवादी काँग्रेस, संभाजी ब्रिगेड व इतर विरोधी गटातील पक्षांनी संघटनांनी केला होता. संभाजी ब्रिगेडने तर बाबासाहेबांवर काळी शाई देखील फेकली होती. बाबासाहेब पुरंदरे यांना जेव्हा महाराष्ट्रभूषण देण्यात आला त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने याला कडाडून विरोध केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेबांना मनुवादी व शिवाजी द्रोही असे देखील म्हटले होते. मात्र आज याबाबत जेम्स लेन यांनी खुलासा केला असून मला कोणीही छत्रपती शिवाजी महाराजांवर कसलीच माहिती पुरवली नव्हती असे एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे.

यावेळी जेम्स लेन म्हणाला की मला कोणीही छत्रपती शिवाजी महाराजांवर कोणतीही माहिती पुरवली नाही. महाराष्ट्रात छत्रपतीं बद्दलजी कोणती पुस्तक आहेत त्या पुस्तकात मधून मी माझं पुस्तक लिहिलं आहे. माझ्या पुस्तकामध्ये छत्रपतींचा इतिहास आहे असा माझा दावा नाही. मी फक्त छत्रपती शिवाजी मराजांबद्ल बद्दल काय काय लिहिलं गेलंय ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाजी महाराजांचे गुरु कोण यासंदर्भात मतमतांतरे आहेत काहींच्या प्रमाणे ते रामदास स्वामी यांच्या प्रमाणे ते संत तुकाराम आहेत यामुळे मला कोणीही कुठलीच माहिती पुरवली नाही.

यावेळी जेम्स लेन म्हणाला की मला कोणीही छत्रपती शिवाजी महाराजांवर कोणतीही माहिती पुरवली नाही महाराष्ट्रात छत्रपतीं बद्दल जी कोणती पुस्तक आहेत त्या पुस्तकात मधून मी माझं पुस्तक लिहिलं आहे माझ्या पुस्तकामध्ये छत्रपतींचा इतिहास लिहिला आहे असा माझा दावा नाही मी फक्त छत्रपती बद्दल काय काय लिहिलं गेलंय ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाजी महाराजांचे गुरु कोण यासंदर्भात मतमतांतरे आहेत काहींच्या प्रमाणे ते रामदास स्वामी यांच्या प्रमाणे ते संत तुकाराम आहेत यामुळे मला कोणीही कुठलीच माहिती पुरवली नाही.माझं पुस्तक ऐतिहासीक नाही.

Related Articles

Back to top button