जळगाव शहर

जळगावकरांनो बहिणाबाई महोत्सवात ७ दिवस मिळणार सांस्कृतिक मेजवानी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२२ । खान्देशाच्या सांस्कृतिक चळवळीला बळ देणारा बचत गटाच्या महिलांना आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्वपुर्ण ठरलेला बहीणाबाई महोत्सव २०२२ याचे सातव्या वर्षाचे आयोजन दि. १८ ते २४ एप्रिल २०२२ बॅ. निकम चौक सागर पार्क या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचीत्य साधुन सात दिवस विविध सांस्कृतिक कार्येक्रमाचे आयोजन या महोत्सवात करण्यात आलेले आहे.


महिला बचत गटांचा महत्वपुर्ण सहभाग
महिला बचत गटाने निर्माण केलेल्या वस्तुंना हक्काच व्यासपीठ निर्माण व्हाव त्यांनी निर्माण केलेल्या वस्तुंना योग्य ती किंमत मिळावी व त्यातुन त्यांची आर्थिक उन्नती व विकास व्हावा हा मुळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. महिला बचत गटांचा वाढता प्रतिसाद पाहता या महोत्सवात जळगांवसह खान्देशातील २०० महिला बचत गट खान्देशा बाहेरील नामवंत अशी ३० महिला बचत गट अशी २३० बचत गटांना नाममात्र दरात या महोत्सवात स्टॉल उपलब्ध करून देण्यात आली आहे.


सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी
प्रामुख्यान खान्देशातील लोककला व लोककलावंतांच्या जतन व संवर्धनाच्या प्रक्रियेत बहीणाबाई महोत्सव आयोजनाचा मुख्य उद्देश आहे खान्देशातील विविध लोककला शाहीरी, भारूड, लग्नगीते, वहीगायन, आदी लोककलांबरोबरच शालेय व महाविद्यालयीन युवा कलावंतांना आपली कला सादर करण्यासाठी बहीणाबाई महोत्सवाचा सांस्कृतिक मंच खुला ठेवण्यात आला आहे. खान्देशातील लोककलेसोबतच महाराष्ट्रातील नामवंत अशी लोककलावंतांना यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

बहीणाबाई खादय महोत्सव
बहीणाबाई महोत्सवाचे खास आकर्षण म्हणजे बहीणाबाई खादय महोत्सव बचत गटाने तयार केलेल्या विविध खादय पदार्थाना जळगांव नागरीकांची विशेष मागणी असते भरीत भाकरी, शेवभाजी, खापरावरची पुरणपोळी सह खान्देशातील विविध खादय पदार्थांचा या महोत्सवाच्या निमित्तान जळगांवकर नागरीक आस्वाद घेत असतात.


बहीणाबाई पुरस्कार व बहीणाबाई विशेष सन्मान
सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व महिला विकासाच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी बहीणाबाई पुरस्काराने सन्मानित करण्यात येते खान्देशासह राज्यभरात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या दहा व्यक्तींना बहीणाबाई पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यावर्षी बहीणाबाई सांस्कृतिक सन्मान या विशेष पुरस्काराने खान्देशासह राज्यभरातील सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती संस्थाचा गौरव या महोत्सवात करण्यात येणार आहेत.


महोत्सवास नागरीकांचा प्रतिसाद
गत सहा वर्षात बहीणाबाई महोत्सवास जळगांव शहर नागरीकांसह जिल्हाभरातुन मोठया संख्येन हजेरी लावली यावर्षी देखील अंदाजे १ लाख नागरीक या महोत्सवाला भेट देतील असा अंदाज असुन त्यानुसार संपुर्ण महोत्सवाचे आयोजन नियोजन करण्यात आले आहे.


बहिणाबाई महोत्सव सहा वर्षात काय साध्य झाले

• गत सहा वर्षात महिला बचत गटांची ५ कोटी ४५ लाखांची आर्थिक उलाढाल
• गत सहा वर्षात महाराष्ट्रातील नामवंत लोककलावंतांचा सहभाग
• गत सहा वर्षात सिनेतारका चित्रपट कलावंत व नाटयकलावंतांची महोत्सवास उपस्थिती
● गत सहा वर्षात जळगांव जिल्हयातील शाळा, महाविद्यालय, सांस्कृतिक संस्था यांचा लक्षनिय सहभाग
• गत सहा वर्षात खान्देशासह महाराष्ट्रातील लाखोंच्या संख्येन नागरीकांची उपस्थिती
• गत सहा वर्षात खान्देशासह महाराष्ट्रात नावारूपाला आलेली महोत्सव बहिणाबाई महोत्सव

Related Articles

Back to top button