बातम्या

मोठी बातमी ! २ गटातील हाणामारीत ५ जण जखमी ; १८ जणांविरुद्ध गुन्हा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२२ । यावल तालुक्यातील सांगवी खुर्द येथे मागील गुन्ह्याबद्दल टोचून बोलण्याच्या कारणावरून दोन गटांत तुफान हाणामारी झाली. त्यात परस्परांविरुद्ध फिर्याद दिल्यानुसार दाेन्ही गटाच्या एकूण १८ जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटना शुक्रवारी रात्री घडली असून दोन्ही गटातील पाच जण जखमी झाले.

अधिक माहिती अशी कि, सांगवी खुर्द येथील सुनील रामदास कोळी यांच्या फिर्यादीनुसार शुक्रवारी रात्री त्यांचा लहान मुलगा लखन कोळी हा मुंजोबाच्या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यासाठी गावात गेला. त्यावेळी रस्त्यात शुभम प्रमोद धनगर, नीलेश संजय धनगर, संदीप संजय धनगर, गणेश मधुकर धनगर यांनी मागील एका गुन्ह्यात आमचे लोक सुटून आले तुमच्याने काहीच झाले नाही, असे सांगतले. त्याचा जाब विचारल्यावर या चौघांसह संजय वसंत धनगर, कैलास वसंत धनगर, प्रमोद वसंत धनगर व बबलू कैलास धनगर या आठ जणांनी लखनला जबर मारहाण केली. तेव्हा सुनील काेळी व त्यांचा मुलगा तेथे गेले व भांडण सोडवून जखमी लखन यास यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. त्यास मारहाण करणाऱ्या आठ जणांविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप सूर्यवंशी करत आहे.

Related Articles

Back to top button