जळगाव सायकलिंग असोसिएशनतर्फे आयोजित सायकलिंग स्पर्धा उत्साहात
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२२ । गेल्या ५ वर्षा पासून जळगावात सायकलिंगच्या माध्यमातून नागरिक मोठ्या संख्येने व्यायाम करायला लागले आहेत. या निमित्ताने ओडिक्स इंडिया हा क्लब लांब पल्ल्याच्या सायकलिंग इव्हेंटचे आयोजन करतात. या क्लबने जळगाव सायकलिंग अससोसिशन (जे.सी.ए) सोबत 300 किलोमीटर BRM स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
आकाशवाणी चौक पासून फ्लॅगऑफ करून स्पर्धेला शनिवारी दुपारी ४ वाजता सुरवात झाली.आकाशवाणी चौ ते हॉटेल गोपाळ कृष्ण ,फर्दापूर – ते -अजिंठा चौक- ते – मलकापूर ते सागर पार्क जळगाव येथे फिनिश पॉईंट होता. या स्पर्धेमध्ये ७ जणांनी ऑनलाईन पद्धतीने नाईट 300 किलोमीटर BRM मधे सहभाग नोंदवला आणि ही स्पर्धा 18 तासाचा आत रविवारी पूर्ण केली.
स्पर्धेचा यशस्वीते साठी जळगाव जिल्ह्यातील पहिले एस.आर आणि आयर्नमेन स्वप्निल मराठे,जिल्हा नियोजन अधिकारी व प्रसिद्ध सायकलपटू प्रतापराव पाटील, जे.सी.ऐ. चे अध्यक्ष महेश सोनी आणि सचिव सुनील सुखवानी, डॉ.विजय घोलप,वैभव लिंबडा
निशी मंधवाणी, विनोद पाटील,अनुप तेजवाणी,रुपेश महाजन ई. यांनी परिश्रम घेतले.
सहभागी स्पर्धक-
धनश्री चौधरी, निलेश चौधरी, दीपक चौधरी, रितेश पाटील, सरदारसिंग ठाकूर, विकास थोरात, भुपेश व्यास