कामसिद्ध मंदिरात सभामंडपाचे लोकार्पण
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२२ । रोझोदा येथील तीर्थक्षेत्र श्री कामसिद्ध देवस्थान सभामंडपासह अन्य विकासकामांचा लोकार्पण सोहळा, १९ रोजी महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे.
रोझोदा येथील जागृत तीर्थक्षेत्र श्री कामसिद्ध मंदिराच्या प्रांगणात सभामंडप, भक्तनिवास तसेच इतर विकासकामांचा लोकार्पण सोहळा १९ एप्रिल, मंगळवार रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज तर प्रमुख पाहूणे म्हणून गोपालचैतन्य महाराज , महामंडलेश्वर पुरुषोत्तम महाराज, मानेकर शास्त्री , भक्तिकिशोरदास शास्त्री , कृष्णागिरी महाराज, भरत महाराज, स्वरुपानंद महाराज, दुर्गादास महाराज, धनराज महाराज, सुमन तिस्सा, वैशाली दिदी, माजी मंत्री एकनाथ खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार शिरीष चौधरी, जि.प.माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी जि.प.सदस्य सुरेखा पाटील, प्रतिभा बोरोले, डिगंबर महाराज वारकरी समिती चिनावल – पंढरपूरचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे, अमोल जावळे उपस्थित राहणार आहेत.
भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन रोझोदा येथील श्रीराम व श्री कामसिद्ध मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष विजय महाजन, उपाध्यक्ष टेनूदास फेगडे, सचिव डाॅ.विजय धांडे, रमेश महाजन, गुणवंत टोंगळे यांनी केले आहे.कार्यक्रमाच्या आयोजनाची तयारी पूर्ण केली जात आहे.
रोझोदा येथे श्री कामसिद्ध मंदिरात सभामंडप व भक्त निवास लोकार्पण सोहळा १९ एप्रिलला संत महंतांच्या उपस्थितीत संपन्न होणार अाहे.