⁠ 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | जिल्ह्यात अल्पसंख्याक क्षेत्रासाठी ९ कोटी ४० लाखांच्या निधीला मंजुरी

जिल्ह्यात अल्पसंख्याक क्षेत्रासाठी ९ कोटी ४० लाखांच्या निधीला मंजुरी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२२ । राज्याच्या अल्पसंख्याक विकास विभागातर्फे शहरी आणि ग्रामीण भागातील अल्पसंख्यांक बहुल भागात मूलभूत-पायाभूत सुविधा देण्यासाठी ५४ कामांना ९ कोटी ४० लाख रूपयांच्या कामांना मंजुरी मिळाली अाहे. यात १० शादीखाने, २ सभागृह व ९ ठिकाणी कब्रस्तानास संरक्षक भिंतीचा समावेश असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.


अल्पसंख्याक नागरी भागातील कामांसाठी ४ कोटी ५५ तर ग्रामीण भागांसाठी ४ कोटी ८५ लाख अशा निधीला मंजुरी मिळालेली आहे. नगरपंचायत झालेल्या नशिराबाद येथे शादीखाना बांधकामासाठी २५ लाख तर कब्रस्तानला संरक्षण भिंत बांधण्यासाठी २५ लाख अशा एकूण ५० लाखांचा निधी मिळणार आहे.


ग्रामीण भागातील ४१ कामांसाठी ४ कोटी ८५ लाख
बोरनार आणि शिरसोली येथे शादीखाना बांधकामांसाठी प्रत्येकी २५ लाख, अमळनेर तालुक्यात शिरसाठे आणि मांडळ येथे प्रत्येकी १५ लाखांचे शादीखाने बांधण्यात येणार आहेत. पारोळा तालुक्यातील शिरसोदे येथे शादीखाना १० लाख आणि शेळावे बुद्रुकला कब्रस्तानला संरक्षण भिंत १० लाख, चोपडा तालुक्यात अडावद, धानोरा व लासूर येथे पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी प्रत्येकी १० प्रमाणे ३० लाख मिळणार आहेत. यावल तालुक्यात किनगाव बुद्रुक, दहिगाव, किनगाव खुर्द, साकळी, गोळगाव, वर्डी, कोरपावली आणि हरिपुरा येथे पेव्हर ब्लॉकसाठी तर, पाडळसे शादीखाना हॉल २५ लाख आणि मारूळला गटार बांधकाम १५ लाख अशा एकूण १ कोटी १० लाख रूपये निधीला मान्यता मिळालेली आहे. एरंडोल तालुक्यातील अल्पसंख्यांक वस्त्यांसाठी ५० लाख निधी, पाचोरा तालुक्यातील जारगाव, भोकरी, पिंपळगाव हरेश्‍वर, लोहारी, माहेजी, कुरंगी, सातगाव डोंगरी, शिंदाड, लासगाव, अंतुर्ली, आखतवाडे, पहाण या गावात रस्ते कॉंक्रिटीकरण आणि संरक्षण भिंतीसाठी ७४ लाख रूपयांचा निधी, पिंपळगाव बुद्रुक शादीखाना १० लाख रुपये असा एकूण ८४ लाख रुपयांचा निधी मिळाला अाहे. मुक्ताईनगर तालुक्यातील अल्पसंख्याकबहुल भागातील विविध कामांसाठी ५० लाख रुपये मंजूर झालेले आहेत. तसेच चिनावल येथे शादीखाना २५ लाख आणि गटार बांधकाम १० लाख या कामांना मान्यता मिळाली आहे.


शहरी भागासाठी १३ कामांना ४ कोटी ५५ लाख रुपये
अमळनेर नगरपालिकेच्या अंतर्गत बंगाली फाईल भागात सामाजिक सभागृह बांधकामासाठी २० लाख तर जापान जीन भागात सभागृह बांधकाम १५ लाख , खारोट कब्रस्तान संरक्षण भिंत १५ लाख असे एकूण ४० लाख, नशिराबाद नगरपालिकेत शादीखाना बांधकाम २५ लाख, मुस्लीम कब्रस्तानाला प्रवेशद्वार आणि संरक्षण भिंत काम २५ लाख असा ५० लाखांचा निधी मिळाला आहे. एरंडोल शहरातल्या अल्पसंख्यांक वस्तीत ५० लाख, यावल ते चोपडा रोडवरील मुस्लीम दफनभूमी येथे संरक्षण भिंतीसाठी २५ लाख, मुक्ताईनगर शहरातल्या गट नं ४२४ मध्ये शादीखाना एक कोटी आणि ७१४ मध्ये शादीखाना १ कोटी आणि अल्पसंख्यांक वस्तीत विकासकामे यांच्यासाठी ५० लाख इतका निधी मिळाला आहे. चाळीसगाव येथे पेव्हर ब्लॉक व बंदिस्त गटारी बांधकाम करण्यासाठी ३० लाख रूपयांचा निधी मिळाला आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह