बातम्या
42 कोटींच्या कामाला लवकरच सुरुवात होणार
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२२ । विकासासाठी 42 कोटीचा निधीला नुकत्याच झालेल्या महासभेत मंजुरी देण्यात आली. मात्र अजूनही या कामांना सुरुवात झाली नाहीये. अशावेळी जळगाव शहराच्या दृष्टीने विचार करता लवकरच 42 कोटींचा कामाला सुरुवात करणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी दिली.
याचबरोबर ते असेही म्हणाले की जळगाव शहरातल्या प्रत्येकाचा प्रभागांमध्ये गेल्या तीन वर्षांपासून जो विकास झाला नव्हता तो हळूहळू व्हायला सुरुवात झाली आहे. शहरातील एकही असा प्रभाग नाही ज्या प्रभागात विकास कामांना सुरुवात झालेली नाही. गेल्या साडेतीन वर्षांपासून जळगाव शहराचा थांबलेला विकास हा पुन्हा सुरू होत आहे. येत्या काही महिन्यांमध्ये जळगावकरांना शाश्वत विकास काय असतो हे नक्की पाहायला मिळेल