⁠ 
मंगळवार, मार्च 5, 2024

भीषण ! प्रवाशांनी भरलेली जीप दरीत कोसळली ; 7 जणांचा मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२३ । उत्तराखंडच्या नैनीताल जिल्ह्यात प्रवाशांनी भरलेली जीप ५०० मीटर खोल दरीत कोसळली असून या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहे. ही घटना आज सकाळी घडली आहे. चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटल्याने जीप खोल दरीत कोसळल्याचे सांगण्यात येत आहे.

नैनितालच्या ओखल कांडा गावाजवळ ही दुर्घटना घडली. जीप ५०० मीटर खोल दरीत कोसळली. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. जीपमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक होते.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली असून सध्या मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. अपघातात झालेल्या गाडीत किती लोक होते याची माहिती अद्याप मिळालेली नाही. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, अनेक लोक गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी पुढे पाठवले जात आहे.बाहेर काढण्यात आलेल्या मृतदेहांमध्ये तीन महिला, एक बालक आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.