मक्क्याने गाठला बावीसशेचा आकडा; शेतकऱ्यांना दिलासा
जळगाव लाईव्ह न्यूज । सादिक पिंजारी । सद्या:स्थित वाढत्या उन्हाचे चटके आता उत्तर महाराष्ट्रात वाढत आहे. उन्हाळी पिकात गहू, हरभरासह काही क्षेत्रात मक्का पिकाची ही काही प्रमाणात लागवड केली जाते. मात्र, यंदा सुमारे दोन ते तीन वर्षांनंतर मक्याला चांगले दिवस आले असून सध्या बाजारात क्विंटलमागे सुमारे 2200 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
खरे तर दरवर्षी मक्याचे भाव कमी असतात, केंद्र सरकरानेही मक्याचा हमीभाव क्विंटलमागे फक्त 1870 रुपये इतकाच जाहीर केलाय. अनेकदा हा भाव मिळणेही कठीण असते मात्र, यंदा गेल्या काही महीन्यापासून मक्याच्या भावाने 2200 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी मक्याचा पेरा जास्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचा मोठा दिलासा मिळाला आहे. आता एकीकडे कांद्याच्या भावामध्ये कमालीची घसरण झाली आहे. दुसरीकडे मक्याचे वाढणारे भाव शेतकऱ्यांना दिलासा देत आहेत. येणाऱ्या काळात या भावात अजून वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हे पाहता आता शेतकऱ्यांनीही एकच पीक न घेता वेगवेगळ्या पिकांकडे वळण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
मक्याची कुकुटपालन व्यवसायात खाद्य म्हणून मोठी मागणी
मक्याला सध्या कुकुटपालन व्यवसायात खाद्य म्हणून मोठी मागणी आहे. अनेकांनी मक्याचे दर कमी असताना खरेदी केली नाही. त्यामुळे हे सारे व्यावसायिक आता मक्याच्या खरेदीसाठी सरसावले आहेत. त्यात मक्याचे उत्पादनही कमी झाल्याने भाव वाढत आहेत. गेल्या दोन ते तिन वर्षांपूर्वी मका दोन हजारावर गेला होता. मात्र आता तोही टप्पा ओलांडून भाव चक्क 2200 पर्यंत गेले आहेत. शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.