⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

ग्रामीण भागातील बस सेवा सुरू करा : नागरिकांची मागणी

जळगाव लाईव्ह न्यूज । सादिक पिंजारी । राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून ग्रामीण भागातील बस सेवा बंद आहे. परिणामी प्रवाशांनसह शाळकरी विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही बस सेवा लवकर सुरू करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त केली आहे.

ग्रामीण भागातील खेडेगावांमधील बस सुविधा एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बंद असल्यामुळे प्रवाशांनसह शाळकरी विद्यार्थ्यांना प्रवासासाठी खासगी वाहनांचा सहारा घ्यावा लागत आहे. तसेच जेष्ठांसह, महिलावर्ग व लहान मुलांचे अतोनात हाल होऊन त्यांना याचे त्रास सोसावे लागत असुन या संपाचा फायदा घेवुन प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे खासगी वाहनचालकांकडून घेतले जात आहे. ज्या प्रमाणे शहरी भागातील बस सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे ग्रामीण भागातील गावांमधील बस सुविधा देखील सुरू करण्यात याव्या अशी एकच मागणी या परिसरातील नागरिकांमधून केली जात आहे.