accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जागीच ठार
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२२ । तालुक्यातील नशिराबाद येथे रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत जगन्नाथ रघुनाथ मिस्तरी (वय ५५) या वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी येथील पोलीसांत अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
अधिक माहिती अशी की, जगन्नाथ रघुनाथ मिस्तरी रा. खालची अळी, नशिराबाद ता.जि.जळगाव हे मंगळवार १२ एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास नशिराबाद येथील बसस्थानकाजवळून राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असतांना भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात होताच अज्ञात वाहनधारक वाहन घेऊन पसार झाला होता. याबाबत सुधाकर रामदास जाधव यांच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अतुल महाजन करीत आहे.