जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२२ । यावल तालुक्यातील शिरसाड येथे बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या एकावर येथील पोलीसांनी कारवाई केली. त्यात एकाला ताब्यात घेतले असून १ हजार ४०० रूपयांची गावठी दारू हस्तगत करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की, शिरसाड गावाच्या बाहेर भोनक नदीच्या पात्रात एकजण गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असल्याची गोपनिय माहिती यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशित कांबळे यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे, पोहेकॉ सिकंदर तडवी, पोकॉ चंद्रकात पाटील, होमगार्ड बोसरे यांना सोमवारी ११ एप्रिल रोजी कारवाईच्या सुचना दिल्या. त्यानुसार पोलीसांनी सायंकाळी ६ वाजता धडक कारवाई करत दारू विक्री करणारा शिवाजी लक्ष्मण धोबी (निंबाळकर) वय-४९, रा. शिरसाड ता. यावल याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १ हजार ४०० रूपये किंमतीची ३५ लिटर गावठी हातभट्टीची दारू हस्तगत केली आहे. यावल पोलीस ठाण्यात पोकॉ चंद्रकांत पाटील यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.