नरेंद्र मोदी यांनी देशात आता सामान नागरी कायदा आणावा – राज ठाकरे

एप्रिल 12, 2022 8:52 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२२ । नरेंद्र मोदी यांनी देशात आता सामान नागरी कायदा आणावा अशी मागणी राज ठाकरे यांनी ठाणे येथील सभेत दिली. याचबरोबर देशातील लोकसंख्या नियंत्रण आणणारा कायदा करा अशी मागणी देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.गुढी पाडव्याच्या सभेनंतर अनेकांनि जे अकलेचे तारे तोडले त्यांना उत्तर देण्यासाठी मी सभा घेतली आहे असं राज ठाकरे म्हणाले. ईडीने नोटीस दिली म्हणून ट्रॅक बदलला हा गैरसमज. मला कोणतीही नोटीस येवो, अशा नोटिसींनी मी भीक घालत नाही.

raj thackeray jpg webp

यावेळी त्यांनी माझ्या ताफ्याला काही जण अडवणार आहेत हे गुप्तचर विभागाला समजलं, पण पवारांच्या घरावर एसटी कर्मचारी आंदोलन करणार आहेत हे समजलं नाही असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला आहे. आजची ही सभा मोठे स्क्रीन लावून अनेक राज्यांमध्ये दाखवली जात आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेचे राज्याच्या राजकारणावर उमटलेले पडसाद अजूनही विरलेले नाहीत. त्याच पार्श्वभूमीवर अवघ्या दहा दिवसांत राज ठाकरे यांची ठाण्यात आज दुसरी सभा होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now