जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२२ । ऑनलाईन ट्रेडींगमध्ये चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष देत मोहाडीरोडवरील तरूणाची ५ लाख ७६ हजाराची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सचिन अशोककुमार मंदान (वय-२५) रा. एक्झोटीक अपार्टमेंट, मोहाडी रोड जळगाव त्यांचे जनरल स्टोर दुकान असून दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करतात. मार्च २०२१ पासून ते आतापर्यंत त्यांना इंस्टाग्राम या सोशल मीडिया साइटवरील ट्रेडर्स काजल या फायनान्शियल ॲडव्हायझर अँड ट्रेडर्स या नावाचे इन्स्टाग्राम या खातेदाराले ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये चांगला नफा मिळवून देईल असे आमिष दाखविले.
समोरील अनोळखी व्यक्तीने सचिन मंदान यांच्याकडून डिमॅट खात्याचा युजर आयडी व पासवर्ड घेऊन शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना अज्ञात व्यक्तीने मंदार यांच्याकडून वेळोवेळी दिलेल्या खाते क्रमांकावर पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार सचिन मंदार यांनी ५ लाख ७६ हजार १५१ रूपये भरले. यात त्यांना एकाही रूपयांचा फायदा झाला नाही असे लक्षात आल्यावर त्यांनी जळगाव सायबर पोलीसात धाव घेवून तक्रार दिली.
त्यांच्या तक्रारीवरून ट्रेडर्स काजल फायनान्शियल ॲडव्हायझर अँड ट्रेडर्स या नावाचे इन्स्टाग्राम खातेधारकाविरोधात जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे हे करीत आहे.