जळगाव जिल्हा

रक्तदान शिबीराचे आयोजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२२ । अनुसूचित जाती, वंचित दुर्बल घटकांच्या सर्वगिण विकासाचे ध्येय म्हणून विविध कल्याणकारी योजना राज्यभर राबविण्यात येत आहेत. या सर्व योजनांची माहिती सर्व सामान्य जनतेला व्हावी तसेच त्यांचे उद्देश साध्य व्हावेत या करीता राज्यात “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम” दि. ६ एप्रिल २०२२ ते १६ एप्रिल २०२२ या कालावधीत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातुन साजरी करावी.

असे शासन निर्देश असल्याने सदर कार्यक्रमाचे औचित्य साधुन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, महाबळरोड, मायादेवी मंदिरा समोर जळगाव येथे दि. ११ एप्रिल, २०२२ रोजी सकाळी ८.०० वाजता रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असून जिल्हयातील इच्छुक नागरीकांनी सदर शिबीरामध्ये स्वयंमस्फुर्तिने सहभागी व्हावे असे आवाहन, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगाव यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

Related Articles

Back to top button