जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२२ । चोपडा तालुक्यातील कुंड्यापाणी येथील आशा सेविका शरीफा तडवी यांच्या सतर्कतेमुळे गावातील २६ वर्षीय गर्भवती महिलेचे प्राण वाचले.
आशा सेविका तडवी नेहमीप्रमाणे गावात सर्व्हेक्षणाचे काम करत होत्या. त्यांना सुमित्रा भुरसिंग पावरा (वय २६) या गर्भवती महिलेची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी गट प्रर्वतक एलिजा मोरे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिले. गर्भवती महिला उपचारासाठी नकार देत होती. त्यामुळे महिलेचा भाऊ, वहिनी आणि वडील यांना परिस्थितीचे गांभीर्य सांगितले. तसेच गर्भवतीला प्रथम धानोरा आरोग्य केंद्रात व नंतर १०८ रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. महिलेच्या पोटातून मृत बाळ काढून तिचे प्राण वाचवण्यात यश आले.