चाळीसगाव
चाळीसगावात किरीट सोमय्यांचा शिवसेनेतर्फे निषेध
जळगाव लाईव्ह न्यूज । तुषार देशमुख । आयएनएस विक्रांतच्या नावाखाली गोळा केलेल्या पैशांचा किरीट सोमय्याने घोटाळा करुन देशाशी गद्दारी केलेली आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करावा. अशी घोषणा देत चाळीसगाव शिवसेनेतर्फे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोमय्याच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले तसेच सोमय्याचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला.
तसेच शिवसेनेचे प्रवक्ते ज्येष्ठ नेते संजय राऊत आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आकस बुद्धीने खोटेनाटे आरोप करून ईडी या तपास यंत्रणेचा बाहुल्या सारखा वापर करून केंद्र सरकार करीत असलेल्या गैर प्रकार असल्याचे म्हणत निषेध करण्यात आला. या प्रसंगी चाळीसगाव शहर व तालुक्यातील शिवसेनेचे शिवसैनिक व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.