अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले,गुन्हा दाखल

एप्रिल 7, 2022 1:56 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२२ । अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना नुकतीच भुसावळ परिसरात समोर अली आहे. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदविण्यात्त आला आहे.

palayan jpg webp

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळ परिसरातील एका भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास आहे. ५ एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले. मुलीच्या नातेवाईकांनी परिसरात शोध घेतला असता ती कुठेही आढळून आली नाही. अखेर त्यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन वाघमारे हे करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now