⁠ 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | सलग दहा दिवस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाचे आयोजन

सलग दहा दिवस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाचे आयोजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ एप्रिल २०२२ । सर्वाना समान न्याय, समता व बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देऊन देशाला संवैधानिक दिशा देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती राज्यभरात आजपासून सलग दहा दिवस अभिनव पध्दतीने साजरी करण्याचे नियोजन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने केले असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.


६ ते १६ एप्रिल, २०२२ राज्यातील सर्व जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्य वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम राबविल्याचे नियोजन विभागाने केले असून यासाठी विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या अध्यक्षतेखाली अंमलबजावणी व देखरेख समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत विभागाचे सहसचिव, समाज कल्याण आयुक्त बार्टी चे महासंचालक तसेच मुंबई श्हराचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त आदीचा समावेश करण्यात आला आहे.


असा असेल सामाजिक समत कार्यक्रम – सामाजिक न्याय विभागाने ६ एप्रिल पासून सलग दहा दिवस राज्यातील सर्व जिल्ह्यात आयोजित करण्यात येणार असलेल्या दैनंदिन उपक्रमाचे शासन परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार ६ एप्रिल रोजी या सामाजिक समता कार्यक्रमाचे सर्व जिल्ह्यांमधून उदघाटन करण्यात येईल व पुढील उपक्रमांची जिल्हा स्तरावर माहिती प्रसिध्द करण्यात येईल. याची जबाबदारी संबंधित जिल्ह्यातील जिल्हा समाज कल्याण अधिकारी व सहाय्यक आयुक्त यांना देण्यात आली आहे. ७ एप्रिल रोजी विभागाच्या सर्व महाविद्यालये, आश्रमशाळा, वसतिगृहे, निवासी शाळा आदी ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाटय स्पर्धा आयोजित करण्यात येतील.


८ एप्रिल रोजी जिल्हा व विभाग सतरावर कार्यक्रम आयोजित करुन स्वाधार शिष्यवृत्ती, मिनिट्रॅक्टर आदी लाभार्थीना प्रतिनिधिक स्वरुपात वितरण करण्यात येईल, ९ एप्रिल रोजी, ज्येष्ठ नागरिक योजनांच्य जनजागृती संदर्भात मेळावे किंवा तत्सम उपक्रम राबवणे तसेच जिल्हा आरोग्य विभागाच्या समन्वयाने विभागाच्या शैक्षणिक आस्थापनांमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केले जातील. १० एप्रिल रोजी, समता दूतामार्फत ग्रामीण व शहरी भागात लघुनाटय, पथनाटय आदी माध्यमातून विभागाच्या योजनांच्या माहिती बाबत प्रबोधन करण्यात येईल.


११ एप्रिल रोजी, महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करुन विविध वक्त्यांना निमंत्रित करुन महात्मा फुलेंच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यात येईल, दि. १२ एप्रिल रोजी, मर्जिंन मनी योजनेच्या जनजागृती बाबत तसेच लाभ मिळालेल्या लाभार्थीसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करयात येतील. दि. १३ एप्रिल रोजी, संविधान जागर हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येईल.
दि. १४ एप्रिल, सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त असलेल्य सर्व कार्यालये, शाळा, वसतिगृहे इत्यादी सर्व आस्थपनांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधीना निमत्रित करुन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्याठिकाणी व्याख्याने, चर्चासत्रे आदी कार्यक्रम घेतले जातील. त्याचबरोबर कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान मेळावा आयोजित करुन बाबासाहेबांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याची माहिती देणारे व्याख्यान आयोजित केले जाईल. याच दिवशी सर्व जिल्याक तील जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या कार्यरत राहून जात पडताळणी प्रमाणपत्र ऑनलाईन्‍ पध्दतीने वितरीत करतील.


१५ एप्रिल, प्रत्येक सहाय्यक आयुक्त कार्यालयात महिला मेळावे आयोजित करुन बाबासाहेबांच्या महिलांविषयी कार्याची माहिती देणारे कार्यक्रम घेतले जातील तृतीयपंथी जनजागृती व नोंदणी करुन ओळखपत्र देण्याचा उपक्रम राबविण्यात येईल, दि. १६ एप्रिल या अंतिम दिवशी , ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती व नवबौध्द वस्त्यामध्ये स्व्च्छता करणे तसेच वस्त्यामध्ये विभागाचे लाभ मिळालेल्या व्यक्तीचे मनोगत जाणून घेणे आदि उपक्रम राबवून या समता कार्यक्रमाचा समारोप करण्यात येईल,
सामाजिक न्यामंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून राज्यभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता कार्यक्रम राबविला जाणार असून प्रत्येक जिल्ह्यात वरीलप्रमाणे कार्यक्रम राबविण्याची जबाबदारी त्या त्या जिल्हयातील जिल्हा समाज कल्याण अधिकारी व सहाय्य्ज्ञक अयुक्त यांना सोपविण्यात आली आहे. हे सर्व कार्यक्रम यशस्वी करावेत तसेच यात सर्वानी सहभागी व्हावे याबाबत नियोजन करण्यात आले असल्याचे माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगाव योगेश पाटील यांनी दिली आहे.
दरम्यान सदर भारतरत्न डॉ. बाबासाहेब सामाजिक समता कार्यक्रमाचे उदघाटन आज रोजी ६ एप्रिल, २०२२ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिम न्याय भवन जळगाव येथे करण्यात आले यावेळी जात पडताळणी समिती कार्यालय, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सर्व महांमडळाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण योगेश पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.