जळगाव जिल्हा

भुसावळ नागरपालिकेसमोर नियमित पगारासाठी न.पा. कर्मचाऱ्यांची निदर्शने

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ एप्रिल २०२२ । नगरपालिका, नगरपंचायतींमधील १०० टक्के वेतन शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे कोषागारामार्फत करावे, निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी तत्काळ द्यावी, यासह २६ आणि ११ स्थानिक मागण्यांसाठी पालिका कर्मचाऱ्यांच्या नगरपालिका वर्कर्स युनियनसह कृती समितीने मंगळवारी काळ्या फिती लावून काम केले. राज्य शासनाविरुद्ध निदर्शने केली. तरीही या मागण्या मान्य न झाल्यास २० एप्रिलला मुंबईत मोर्चा व धरणे आंदोलन, नंतर १ मेपासून ध्वज वंदनानंतर बेमुदत काम बंदचा इशारा दिला. राज्य स्तरावरील २६ व स्थानिक ११ मागण्यांबाबत पालिका कर्मचाऱ्यांच्या कृती समितीने आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनातील पहिल्या टप्प्यात मंगळवारी काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात आली.

नगरपालिका वर्कर्स युनियनचे अध्यक्ष राजू खरारे व पदाधिकारी, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस, अखिल भारतीय सफाई कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी संघटना, सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. १ मे पासून कामबंद आंदोलनाचा दिला इशारा पालिका कर्मचाऱ्यांच्या कृती समितीने मंगळवारी काळ्या फिती लावून पालिकेसमोर निदर्शने केली. यानंतरही शासनाने व स्थानिक प्रशासनाने दखल न घेतल्यास २० एप्रिलला वरळी (मुंबई) येथील नगरपालिका प्रशासन कार्यालयावर मोर्चा काढू. त्याचाही उपयोग न झाल्यास १ मे पासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले जाईल. – राजू खरारे, अध्यक्ष, नगरपालिका वर्कर्स युनियन, भुसावळ भुसावळ येथे अांदाेलन करताना पालिकेचे कर्मचारी.

Related Articles

Back to top button